
देशभरात एआयचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वापरकर्त्यांना एआयच्या मदतीने प्रत्येक लहान मोठ्या अडचणींवर योग्य ते उपाय मिळत आहे. मात्र जगभरात ख्याती असलेला हा ओपनएआयचा लोकप्रिय एआय चॅटबॉट ChatGPT आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून, कॅलिफोर्नियामध्ये त्याच्याविरुद्ध अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. चॅटजीपीटीवर “आत्महत्या प्रशिक्षक” (Self Harm) म्हणून काम करण्याचा आरोप आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात ChatGPT विरुद्ध सात वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ChatGPTविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात ओपनएआयवर निष्काळजीपणा आणि आत्महत्या करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. टेक जस्टिस लॉ प्रोजेक्ट आणि सोशल मीडिया विक्टिम्स लॉ सेंटरने चॅटजीपीटी विरोधात गुन्हा दाखल केलाय. OpenAI ने नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा त्यांची वर्दळ वाढवण्यावर जास्त भर दिल्याचा आरोप केला आहे. असंख्य अंतर्गत त्रुटी असूनही, हे मॉडेल वेळेआधीच लाँच करण्यात आले. यामुळे वापरकर्त्यांचे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे.
सुरूवातीला सर्व वापरकर्यांनी चॅटजीपीटीचा वापर रेसिपी आयडिया, शालेय प्रकल्प, कामात मदत इत्यादी सोप्या कामांसाठी केला. त्यामुळे ते डिजिटल असिस्टंट म्हणून सर्वांसाठी उपयुक्त ठरत होते. पण हळूहळू त्याचा गैरवापर वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ChatGPT कार्यक्षमतेत सुधारणा आवश्यक वापरकर्त्यांना व्यावसायिक मदत घेण्यास प्रोत्साहित करण्याऐवजी, चॅटबॉटने हानिकारक विचारांना प्रोत्साहन दिले. स्वत: जीवन धोक्यात घालण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे आता तक्रारदार एआय चॅटबॉटच्या कार्यक्षमतेत सुरक्षा सुधारणांची मागणी करत आहेत.
AI मुळेच नापास झाली, Chat gtp ने दिली चुकीची उत्तरे; प्रसिद्ध सेलिब्रिटीचा रंजक किस्सा




























































