अजितदादांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरातचा संबंध? दुर्घटनेपूर्वी आणि नंतर मोठे आर्थिक व्यवहार, रोहित पवार यांचा संशय वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरात याचा संबंध असल्याचा संशय आणखी गडद झाल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. अजितदादांचा अपघात झाला त्या दिवशी तसेच अपघातापूर्वी आणि अपघातानंतरच्या दिवशी खरात याने मोठे आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. तसेच खरातने व्हीएसआरच्या विमानातून सातत्याने प्रवास केला होता. त्यामुळे त्याचा अजितदादांच्या अपघाताशी संबंध असण्याची शक्यता असू शकते, असे रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातामध्ये अजित पवार यांचे निधन झाले. त्यादरम्यान 27, 28 आणि 29 जानेवारी या तीन दिवसांत ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. त्यांच्या विधानाचा दाखला देत रोहित पवार यांनी खरात याच्यावर आरोप केले आहेत. सीआयडीने यासंदर्भात खरात आणि संबंधित लोकांचीही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.