
इराणशी सुरू असलेल्या युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की इराणशी सुरू असलेले युद्ध पुढील चार आठवडे सुरू राहू शकते. आमचा असा अंदाज आहे की, हे युद्ध किमान चार आठवडे सुरू राहू शकते. मात्र, त्याआधीच हा संघर्ष संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी युद्धात प्राण गमावलेल्या अमेरिकन सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी असे संकेत दिले की इराणविरुद्ध अमेरिकेची लष्करी कारवाई आणखी चार आठवडे चालू शकते. ते म्हणाले, ही चार आठवड्यांची प्रक्रिया असेल. आम्हाला अंदाज होता की ती चार आठवडे किंवा त्यापेक्षा कमी काळ चालेल. हा एक मोठा देश आहे, म्हणून त्यासाठी चार आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. मात्र, त्यापूर्वीच हा संघर्ष संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अमेरिकेची लष्करी कारवाई नियोजित वेळेपेक्षा पुढे आहे आणि अनेक लक्ष्ये शिल्लक आहेत. सर्व काही योजनेनुसार चालू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही त्यांचे संपूर्ण नेतृत्व नष्ट केले आहे, या कारवाईत त्यांचे अठ्ठेचाळीस महत्त्वाचे नेते मारले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी युद्धात प्राण गमावलेल्या तीन अमेरिकन सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत महान असा त्यांचा गैरव केला. त्यांनी कबूल केले की त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सैनिकी कारवाईतील ही पहिलीच घटना आहे. व्हेनेझुएलाचे हुकूमशहा निकोलस मादुरो यांच्या कारवाईवेळी आणि मागील बॉम्बस्फोटांमध्ये आणि इराणी अणुसुत्रांवर झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिकाऱ्यांनी मृत सैनिकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे आणि योग्य वेळी ते वैयक्तिकरित्या त्यांच्याशी भेटतील.
इराणशी भविष्यात होणाऱ्या चर्चेच्या शक्यतेबद्दल ट्रम्प म्हणाले की ते चर्चेसाठी आपण तयार आहोत. इराणने गेल्या आठवड्यात हे प्रयत्न केले असते तर हा अनर्थ घडला नसता असेही ते म्हणाले. आता सौदी अरेबिया देखील या लढाईत सामील होत आहे कारण त्यांनादेखील लक्ष्य केले गेले होते. त्यांनी बहरीन, कतार आणि जॉर्डन सारख्या मैत्रीपूर्ण देशांच्या नेत्यांशी देखील चर्चा केली आहे. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांनंतर इराणमध्ये लोकशाही वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तेथे अनेक सकारात्मक गोष्टी घडू शकतात, त्यासाठी आखाती देशात अमेरिकेची लष्करी मोहीम पूर्ण ताकदीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
























































