गाझापट्टीनंतर इस्रालयने आता राफा शहरावर हल्ले तीव्र केले आहेत. निर्वासितांच्या छावण्यांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहे. त्यातच राफा शहरातून हमासचे नामोनिशाण मिटवण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी लष्कराला एक महिन्याची मुदत दिली आहे. राफा शहरात हमासचा एकही अतिरेकी शिल्लक राहता कामा नये, यादृष्टीने लष्कराला आदेश दिले आहेत. नेतान्याहू यांच्या आदेशानंतर राफावर नवे संकट उभे ठाकले आहे.
राफा शहरातील टनेलवर हल्ले करून हमासच्या अतिरेक्यांना शोधले जात आहेत. हमासचे अतिरेकी आमच्याजाळ्यात अडकत आहेत, असे आयडीएफचे कर्नल बेटिटो यांनी सांगितले.
राफामध्ये इस्रायलने ऑपरेशन सुरू केले. शहरात हमासचे फक्त 2 हजार अतिरेकी उरले आहेत.
7 ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाला सुरुवात झाली. युद्ध थांबावे म्हणून अनेक देश इस्रायलला धमकी देत आहेत. हमासचा पूर्ण खात्मा हे इस्रायलचे लक्ष्य आहे.