
लेबनॉनची राजधानी बैरुतच्या दक्षिण उपनगरांवर सोमवारी इस्रायलने भीषण हवाई हल्ले केले, अशी माहिती लेबनॉनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. दुसरीकडे, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येचा बदला म्हणून इस्रायलवर रॉकेट आणि ड्रोनचा वर्षाव केल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे.
‘बैरुतच्या दक्षिण उपनगरांना लक्ष्य करून इस्रायलने एकापाठोपाठ एक अनेक हल्ले केले आहेत’, असे लेबनॉनच्या सरकारी ‘नॅशनल न्यूज एजन्सी’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
या हल्ल्यांनंतर बैरुत शहरात अत्यंत शक्तिशाली स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे एएफपीच्या (AFP) पत्रकाराने नमूद केले आहे. या ताज्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील तणाव कमालीचा वाढला आहे.
israeli air strikes on beirut lebanon hezbollah retaliation latest saamana news
Israeli air strikes targeted Beirut’s southern suburbs on Monday. Hezbollah retaliated with rockets and drones following the killing of Iranian leader Ali Khamenei. Get latest international updates on Saamana.
Keywords:
saamana, samana, samna, daily saamana, marathi news, israel lebanon war, beirut strikes, hezbollah, ali khamenei, international news in marathi.

























































