
अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत इटालियन दैनिकाने खळबळजनक दावा केला आहे. एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामागे तांत्रिक दोष नव्हता. वैमानिकानेच जाणीवपूर्वक इंधनपुरवठा बंद केला आणि भीषण विमान दुर्घटना घडली, असे ‘कोरीएर डेला सेरा’ नावाच्या इटालियन दैनिकाने आपल्या वृत्तातून केला आहे. हिंदुस्थानी तपास यंत्रणा तसा अहवाल तयार करीत असल्याचेही म्हटले आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये अहमदाबाद येथे विमान दुर्घटना घडली आणि 260 प्रवाशांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असतानाच इटालियन दैनिकाने नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील सूत्रांच्या हवाल्याने खळबळजनक वृत्त प्रसिद्ध केले आहे. 12 जून 2025 रोजी इंजिनमध्ये इंधन पुरवठा बंद होऊन झालेला अपघात तांत्रिक बिघाडामुळे नव्हता. इंधन पुरवठा जाणीवपूर्वक खंडीत केला गेल्याचे तपास यंत्रणांना आढळले आहे. त्यानुसार अंतिम अहवाल तयार केला जात आहे. यासाठी अमेरिकन तज्ञही मदत करीत आहेत, असे ‘कोरीएर डेला सेरा’च्या वृत्तात म्हटले आहे. दोघा वैमानिकांपैकी एकाने इंधन नियंत्रण स्विच बंद केल्यानंतर विमानाची शक्ती गेली आणि ते जमिनीवर कोसळले, असा दावा सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.
विविध मानवी चुकांबाबत निरीक्षण
दुर्घटनेच्या अंतिम तपास अहवालात वैमानिकांच्या मानसिक आरोग्य देखरेखीसंबंधी शिफारशींचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. दुर्घटनेबाबत सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात आली असून तांत्रिक बाबी तपासल्या आहेत. वैमानिकांकडून झालेल्या मानवी चुकांबाबतही निरीक्षण नोंदवले आहे. तपास यंत्रणांनी काॅकपिटमधील इंधन नियंत्रण स्विचवर पेंद्रित करून महत्त्वर्प्णू भाष्य केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर इटालियन दैनिकाने केलेल्या दाव्यानंतर हिंदुस्थानात खळबळ उडाली आहे.
विदेशातील प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्सचे पुनर्विश्लेषण
डिसेंबर महिन्यात एएआयबीमधील तपास यंत्रणेचे अधिकारी वॉशिंग्टनला गेले होते. त्यांनी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या प्रयोगशाळांमध्ये दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्स डेटाचे पुनर्विश्लेषण केले. तसेच केबिन ऑडिओ रेका@ार्ंडगची सखोल तपासणीदेखील केल्याचे इटालियन वृत्तपत्रातील वृत्तामध्ये नमूद केले आहे.




























































