
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (आयटीआय) म्हटली की त्यात टर्नर, फिटर, इलेक्ट्रीशियन, प्लंबर आणि जास्तीत जास्त कॉम्प्युटरचे प्रशिक्षण मिळणार असाच सर्वांचा समज होता. पण आता आयटीआयमध्ये लवकरच अद्ययावत तंत्रज्ञानाचेही धडे मिळणार आहेत. पुढील वर्षीपासून सौर ऊर्जा तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ, ड्रोन तंत्रज्ञ, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स हे अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरू होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत काwशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या 6 जूनपासून राज्यातल्या 1097 आयटीआय केंद्रांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यासंदर्भात माहिती दिली.