मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका सरकारी कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण करणारी घटना घडली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबतची माहिती विद्यार्थीनींनी आपल्या वर्गमित्रांना सांगितल्यामुळे उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्याभरापासूनच विद्यार्थिनींना धमकावून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. अज्ञात व्यक्ती अनोळखी क्रमांकावरून फोन करून विद्यार्थिनींना त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहेत. आत्तापर्यंत सरकारी कन्या महाविद्यालयातील 70 विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच 50 हून अधिक विद्यार्थिनींनी ब्लॅकमेलरला पैसे दिल्याचेही उघड झाले आहे. यासंदर्भात जबलपूरच्या सायबर सेलला तसते पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. यासंदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टेलीग्राम सारख्या ॲप्सचा वापर महाविद्यालयीन माहिती आणि परिपत्रक विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत टेलीग्राम ॲपच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे नंबर बाहेरून लीक होत असल्याचा संशय प्राचार्यांनी व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांना पुढील तपास करण्याचे आदेशही दिले आहेत.