
पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडारची बहुप्रतीक्षित मोजदाद आणि यादी बनवण्यासाठी प्रक्रिया अखेर लवकरच सुरू होणार आहे. ही मोजदाद तब्बल 48 वर्षांनंतर होणार आहे. रिझर्व्ह बँक निगराणी करणार आहे. याआधी 1978 मध्ये रत्न भंडारातील आभूषणांची मोजदाद झाली होती. ही मोजदाद तब्बल 72 दिवस चालली होती. या संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण तसेच व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.
या रत्न भंडाराच्या मोजदादीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सहमती दर्शविली आली आहे. तर राष्ट्रीयकृत बँकेचे नोंदणीकृत सराफही यावेळी उपस्थित राहणार आहेत. दागिन्यांच्या मोजदादसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक प्रणाली जारी केली आहे. तीन सदस्यीय समिती प्रक्रियेची पूर्णपणे निगराणी करेल. सोने, चांदी आणि इतर किमती आभूषणांसाठी वेगवेगळे बॉक्स असतील. शनिवार-रविवार आणि सण-उत्सवाच्या दिवशी भाविकांच्या गर्दीमुळे मोजदाद केली जाणार नाही. ओडिशा उच्च न्यायालयाने गणती तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
128 किलो सोने, 221 किलो चांदी
‘रत्न भंडार’ हे भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मौल्यवान आभूषणांचा प्राचीन खजिना आहे. 1978 मध्ये झालेल्या मोजदादीनुसार, 128.38 किलो सोने आणि 221 किलो चांदीची आभूषणे आहेत. यामध्ये हिरे-दागिने यांच्याही समावेश आहे.
























































