
अज्ञात कारणावरून लहान भावाने काही नातेवाईकांच्या मदतीने मोठ्या भावाचा व पुतण्याचा भरदिवसा चाकू भोसकून खून केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील बदनापूर शहरातील शंकरनगर भागात घडली. अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे असे मृतांची नावे आहेत. बद
अशोक अंबिलढगे व त्यांचा लहान भावात काही कारणावरून 13 मे रोजी सकाळी बाचाबाची होऊन मारहाणीची घटना घडली. सदर वाद झाल्यानंतर दुपारी 1च्या दरम्यान अशोक अंबिलढगे (55) व त्यांचा मुलगा यश अंबिलढगे (22) हे आपल्या घरात बसलेले असताना अचानक लहान भाऊ विष्णू व त्याच्यासोबत अन्य काही नातेवाईक, मित्र आले आणि पुन्हा वाद- विवाद सुरू झाला. सदर वाद जवळपास २० मिनिटे चालला.
दरम्यान आलेल्या नातेवाईक,मित्र पैकी काही जणांनी थेट अशोक अंबिलढगे यांच्या पोटात तिक्ष्ण हत्याराने वार केले. तसेच यश अंबिलढगे याच्या गळ्यावर चाकूचे वार केल्याने दोघेही रक्ताबंबाळ झाले. अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे यांना तात्काळ बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी विष्णू अंबिलढगे यांना पोलिसांनी तपास कामी पोलीस ठाण्यात नेले. या घटनेमुळे बदनापूर शहरात खळबळ उडाली आहे.