जळगाव – चोपडा शिवारात हेलिकॉप्टर कोसळले, एकाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात हेलिकॉप्टर दुर्घटना झाली. यात एक जणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट गंभीर जखमी आहे.

चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात असलेला हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या परिसरात दुर्घटना दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. दुर्घटना झालेले हेलिकॉप्टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान आहे ही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र हेलिकॉप्टर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात एक जणाचा मृत्यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी आहे. आदिवासी परिसर असल्याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेले.

आपली प्रतिक्रिया द्या