
जळगावातील भडगाव शहरात एका हॉटेलमध्ये भीषण रविवारी स्फोट झाला. या स्फोटात हॉटेलमधील 10 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी भडगाव, पाचोरा आणि जळगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भडगाव शहरातील न्यू मिलन हॉटेलमध्ये रविवारी दुपारी हा स्फोट झाला. यावेळी हॉटेलमध्ये असलेलेल 10 जण जखमी झाले. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हॉटेलमधील फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.