जालना जिल्ह्यातील पारधपासून जवळच असलेले पद्मावतीच्चा धरण पाठोपाठ शेलुद येथील धामणा धरण आज सकाळी १०० टक्के भरले असून परिसरातील 25 ते 30 गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
यावर्षी पावसाने सुरवातीस थोडा विलंब केला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजी निर्माण झाली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून पावसाने दमदार सुरूवात केली असून मागील आठवड्यात भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामणा धरण ओहरफ्लो झाले आणि लेहा ,शेलुद, वडोद तांगडा,जळगाव सपकाळ, हिसोडा यांच्यासह अनेक गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर आज दि,2 सप्टेंबर रोजी पद्मावती पाठोपाठ धामणा धरणही ओहरफ्लो झाले आहे यामुळे पद्मावती धरणाने पारधसह परिसरातील वालसावगी,पारध खुर्द, पद्मावती, वाढोणा, विझोरा तर बुलढाणा जिल्ह्यातील मासरूळ, तरारखेड, गुम्मी, धामणगाव, मढ, पाडळी देऊळघाट आदी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून दमदार पावसाने नदी नाले खळखळ वाहत आहे. शेतातील विहीरीही वरून वाहत आहे असे असले तरी ‘कही गम कही खुशी’याप्रमाणे गेल्या दोन दिवसातून पासून पडणाऱ्या सततच्या पावसाने पिकावर याचा परिणाम होत आहे. सोयाबीन सडण्यास सुरवात झाली असून उडीद मुंग ,तीळ हे पिके हातची गेली आहेत.