जालन्याच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांची तासाभरात बदली

सामना प्रतिनिधी । जालना

दोन महिन्यापासून रिक्त असलेल्या जालना जिल्हाधिकारी पदावर अभिमन्यु काळे यांची नियुक्ती होताच त्यांना तात्काळ माघारी बोलविण्यात आले आहे. जिल्हाचा कारभार पुन्हा प्रभारीच्या हाती देण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गोदिंयाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची जालना जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती.

बुधवारी सायंकाळी पदभार घेतल्यानंतर अभिमन्यू काळे तासाभरातच माघारी फिरले आहे. प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी. खपले यांच्याकडून पदभार स्विकारला होता, त्यानंतर अवघ्या तासाभरातच काळे यांना आपला गाशा गुंडाळून परत जावे लागले. काळे यांना रुजू न होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी काळे यांनी पुन्हा प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी. खपले यांच्याकडे सुत्रे सोपवून रात्रीतूनच माघारी फिरले. जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना गैरप्रकारामुळे ४९ ठिकाणी फेरमतदान झाल्याने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यावर जिल्हाधिकारी काळे यांच्यावर निवडणूक आयोगाने निवडणूक कामांसंदर्भात बंदी घातल्याचे वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या