Jalna News – जालन्यातील गल्हाटी धरण ओव्हर फ्लो, शेतीचे झाले नुकसान

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहापूर -बारसवाडा गल्हाटी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरुन ओसंडून वाहू लागल्याने गल्हाटी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर गल्हाटी नदी दुथडी भरुन वाहत आहे. हवामान विभागाने अंदाज दिल्या प्रमाणे 1 सप्टेंबर सायंकाळपासुनच वरुण राजाचे आगमन झाले तर दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.

रात्र भर पाऊस पडत असल्याने गल्हाटी प्रकल्प हा 100 टक्क्यांनी भरुन सांडव्याद्वारे ओसांडून वाहु लागला. या गल्हाटी प्रकल्प भरल्यामुळे शहापूर,दाढेगाव,धाकलगाव, मंठतांडा,पिठोरी सिरसगाव, सोनक पिंपळगाव, या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असुन परंतु शेतीचे नुकसान झाले आहे. कापुस, सोयाबीन,मुग,बाजरी, मोसंबी, डाळिंब या पिकाचे शेतात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या पिकाचे तत्काळ पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी आसी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

घनसावंगी मतदार संघातील शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधी आमदार राजेश टोपे यांनी कुठल्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये यासाठी सतर्कतेचा व्हिडिओ पाठवला आहे. माजी मंत्री टोपे यांनी सांगितले की, जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी,मंठा,परतुर या भागामध्ये अतिवृष्टी दृश्य आहे. अतिवृष्टीमुळे नदी काठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहावे सतत पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले ओसांडून वाहत आहेत. छोटे-मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.नदी नाल्याला पाणी आले आहे. शेतकऱ्यांने आपले बैल-गाय मुक्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे शेतकऱ्यांनी ही सतर्क राहावे जर पावसामुळे गावातील विजपुरवठा खंडीत झाला आसेल तर महावितरणने तत्काळ पाहणी करुन विजपुरवठा करावा जर पावसामुळे घराची पडझड झालेली आसेल तर सर्व स्तरावर गावातील घराची पडझड,शेतीचे नुकसान, मुक्या जनावरांचे नुकसान आदी ठिकाणी जाऊन पंचनामे करावेत असे आव्हान टोपे यांनी केले आहे.