मुलांना विहिरीत ढकळून जाळून घेतलेल्या महिलेचा अखेर मृत्यू 

27
सामना प्रतिनिधी । परतूर 
जालन्यात कौटुंबिक वादातून पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून स्वतः जाळून घेतलेल्या महिलेचा अखेर शुक्रवारी मृत्यू झाला आहे. सखुबाई मुळे असे या महिलेचे नाव असून तिच्यावर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. विहिरीत ढकलून दिल्याने दोन मुलांचा गुरुवारी मृत्यू झाला होता. क्षुल्लक कारणातून झालेल्या वादामुळे तीघांचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जालन्याच्या परतूर तालुक्यातील अवचार कंडारी येथे कौटुंबिक वादातून सखुबाईने तिच्या 6 वर्षाचा शिवराज आणि 4 वर्षाच्या शिवानी या मुलांना गुरुवारी विहिरीत ढकलून देत स्वत: जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामध्ये दोन मुलांचा बिहिरीत बुडून गुरुवारीच मृत्यू झाला होता, तर  सखुबाई गंभीर जखमी झाल्याने तीला उपचारासाठी संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान उपचार सुरु असताना शुक्रवारी सखुबाई मृत्यू झाला आहे. त्यामुळे शुल्लक कारणामुळे दोन निरागस मुलांसह महीलेच्या मृत्यू झाल्याने परतू तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपली प्रतिक्रिया द्या