Jammu and Kashmir मधील सुंजवान लष्करी तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी

जम्मू-कश्मीरमधील जम्मू दरबारजवळील सुंजवान लष्करी तळावर दहशतवाद्यांनी सोमवारी केलेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला.

दहशतवाद्यांसाठी परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असं लष्करानं एका निवेदनातून सांगितलं आहे.

सोमवारी सकाळी 10.50 च्या सुमारास कॅम्पमधील सेंटरी पोस्टजवळ हा हल्ला झाला. या ठिकाणी 36 इन्फ्रंट्री ब्रिगेडचा तळ होता, अशी माहिती लष्करानं दिली आहे.