जम्मू कश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, दोन प्रवाशांचा मृत्यू

जम्मू कश्मीरमध्ये एक बस दरीत कोसळली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात 45 प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू कश्मीरच्या पूंछ भागात एक बस मेंढर भागात जात होती. तेव्हा खोड धारा भागात चालकाचे बसवरून नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत कोसळले. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यापूर्वी जम्मू कश्मीरच्या रामबन जिल्ह्यात लष्कराची गाडी दरीत कोसळली होती. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला होता.