जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव शुक्रवारी उधळून लावला. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला. सुरक्षा दलांच्या जवानांनी परिसरात वेढा घालून शोध मोहिम सुरू केली आहे.
कुपवाडामध्ये दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची गुप्त माहिती जम्मू काश्मीर पोलीस आणि हिंदुस्थानी लष्कराला मिळाली. त्यांनी शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात शोध मोहिम सुरू केली होती. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातही शुक्रवारी सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली.
Two terrorists have been eliminated by the security forces in the ongoing Operation GUGALDHAR. War-like stores have been recovered. Search of the area is underway and operation is in progress: Indian Army pic.twitter.com/zuMlIq2abJ
— ANI (@ANI) October 5, 2024