
जम्मू आणि कश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बुधवारी बीएसएफने एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. रामगढ सेक्टरमधील भल्लर सीमा चौकीजवळ ही घटना घडली. घुसखोराची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर सीमावर्ती भागात दक्षता वाढवण्यात आली असून अशा घटनांवर कडक नजर ठेवली जात आहे.
घटनास्थळी बीएसएफचे पथक तैनात असून, स्थानिक सुरक्षा दलदेखील सीमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रामगढ सेक्टरमधील भल्लर सीमा चौकीजवळ एक वृद्ध पाकिस्तानी नागरिक येत असल्याचे बीएसएफच्या जवानांच्या लक्षात आले. जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला इशारा दिला. बीएसएफच्या आव्हानानंतर त्याने आत्मसमर्पण केले. प्राथमिक चौकशीत तो नकळतपणे सीमा ओलांडून आला असल्याचे उघड झाले. आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्याला लवकरच परत पाठवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.



























































