
जम्मूत आज तणावपूर्ण शांतता होती. गेले दोन दिवस रात्रभरात सीमेपलीकडून गोळीबार किंवा ड्रोनच्या हालचाली आढळल्या नाहीत अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. रविवारी दिवसभरात जम्मू विभागात आणि विशेषतः नियंत्रण रेषेला लागून असलेल्या पूंछ आणि राजौरी जिह्यांमध्ये तणावपूर्ण शांतता राहिली असे अधिकाऱयांनी सांगितले. रविवारी जनजीवन सुरळीत झाले तर काही भागांमध्ये मात्र बाजारपेठा बंद राहिल्या असे अधिकारी म्हणाले.