शिंदे मालकाच्या घरातून सामान चोरून नेणारे नेते, के. सी. त्यागींचा हल्ला

‘एकनाथ शिंदे यांचे स्वतःचे काय आहे? त्यांनी संघर्ष करून पक्ष काढलेला नाही. ते पक्षाचे मालक नाहीत. मालकाच्या घरातून सामान चोरून नेणारे नेते आहेत. त्यांची नितीश कुमारांशी अजिबात तुलना करू नका,’ असा जोरदार हल्ला संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी आज केला.

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ते बोलत होते. ‘नितीश कुमार म्हणजे शिंदे नव्हेत. नितीश यांनी शौर्य आणि पराक्रमाने राष्ट्रीय जनता दलाशी लढून आजचे स्थान मिळवले आहे. 1995 मध्ये जेव्हा ते मुख्य पक्षापासून वेगळे झाले तेव्हा ते संपले असे सगळेच म्हणत होते. मात्र नितीश यांनी मोठय़ा कष्टाने आणि घाम गाळून स्वतःचा पक्ष निर्माण केला. ते मालक आहेत. शिंदेंशी त्यांची तुलना करू नका,’ असे त्यागी यांनी ठणकावले.