राज्यातले सगळे चोर देवेंद्र फडणवीसांजवळ आहेत. आंतरवालीत मायमाऊलीवर गोळय़ा झाडायला लावणारा फडणवीस माफीला पात्र नाही, असा घणाघाती आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. छगन भुजबळ हा राष्ट्रीय घोटाळा समितीचा अध्यक्ष असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हा अभ्यास नसलेला आदिमानव असल्याची टीकाही जरांगे-पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सोलापुरात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली.
गुडघ्याएवढय़ा माणसांनी बोलू नये!
जरांगे-पाटील यांनी फडणवीस, भुजबळ, दरेकर यांच्याबरोबरच नारायण राणे यांनाही फैलावर घेतले. दहीहंडीत ढाकूम्माकूम् करणाऱया माझ्या गुडघ्याएवढय़ा माणसांनी बोलू नये. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे, असा सणसणीत टोला नाव न घेता राणे यांना लगावला.
मराठा आंदोलकांवर गुन्हा
धाराशीव: राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी राज ठाकरे उतरलेल्या हॉटेल पुष्पक पार्क येथे आंदोलन करणाऱया 11 मराठा तरुणांवर प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान मराठा तरुणांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला, तर दुसरीकडे प्रशासनाच्या वतीने तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.