फेक AI व्हिडीओवरून जावेद अख्तर संतापले, कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

DeepFake AI जनरेटेड व्हिडीओ बनवून कलाकारांची बदनामी केली जात आहे. याचा फटका सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांचा देखील बसला आहे. त्यांच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओवरून जावेद अख्तर संतापले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या एआय-जनरेटेड व्हिडिओमध्ये जावेद अख्तर हे आता आस्तिक झाले असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे. जावेद अख्तर यांनी त्यांच्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या ‘डीपफेक’ व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शुक्रवारी ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी या व्हिडिओवर भाष्य केले. हे असले प्रकार पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आपण सायबर पोलिसांत तक्रार करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जावेद अख्तर म्हणाले.

हिंदुस्थानात डीपफेकविरुद्ध काय नियम आहेत?

केंद्र सरकारने 2025 च्या अखेरीस डीपफेक आणि एआय-जनरेटेड कंटेंटसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. आयटी नियम 2021 अंतर्गत, डीपफेक व्हिडीओ, फोटो संदर्भात तक्रार मिळाल्यापासून 36 तासांच्या आत हे दिशाभूल करणारे कंटेंट काढून टाकणे आवश्यक आहे. तसेच सर्व एआय-जनरेटेड फोटो किंवा व्हिडिओमध्ये ‘एआय-जनरेटेड’ असे स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे.