नीरज चोप्रा पुन्हा नंबर वन

हिंदुस्थानचा ऑलिम्पिक विजेता  आणि स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने ताज्या जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबीज करताना त्याने ग्रेनेडाच्या ऍण्डरसन पीटर्सला मागे टाकले आणि तब्बल नऊ महिन्यांनंतर नंबर वनच्या सिंहासनावर आपले नाव कोरले. नीरजने गेल्या महिन्याभरात दोन स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावताना आपले 90 मीटर भालाफेकीचेही स्वप्न साकारले. गेले अनेक महिने नीरज दुसऱ्या स्थानावर कायम होता. मात्र त्याच्या सर्वोत्तम भालाफेकीने त्याला पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचवले आहे. ताज्या जागतिक क्रमवारीत जर्मनीचा ज्युलियन बेवर तिसऱ्या तर पाकिस्तानचा अर्शद नईम चौथ्या स्थानावर आहे.