राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा दोन ते तीन जणांनी पिस्तुलातून चार ते पाच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. रविवारी रात्री नाना पेठेत ही घटना घडली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल त्यांनी केला.
जयंत पाटील यांनी सोमवारी सकाळी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून सरकारचा खरपूस समाचार घेणारे ट्विट केले. पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 2, 2024
पुण्यात काय घडलं?
ऐन वर्दळ असलेल्या नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा दोन ते तीन जणांनी पिस्तुलातून चार ते पाच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. घरगुती वादातून बंडू आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गणेश लक्ष्मण कोमकर आणि सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.a
View this post on Instagram