ज्या घटनेमुळे ही लोकं सत्तेत आली, ती घटनाच बदलण्यासाठी लोकसभेला अबकी बार चारशे पारची घोषणा देणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवल्याने आता महाराष्ट्रात आपले काही खरे नाही, या भयगंडाने पछाडलेले भाजप महायुतीचे सरकार तिजोरीत खडखडाट असताना कोणत्याही योजना आणून जनतेला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मिंधे सरकारवर केला.
घनसावंगी येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांची शिवस्वराज्य यात्रा जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरात आली. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. खासदार अमोल कोल्हे, आमदार राजेश टोपे, बाबाजानी दुर्राणी, निसार देशमुख, उत्तमराव पवार, सभापती तात्यासाहेब चिमणे, नंदकुमार देशमुख, सतीश होंडे, पंडित कांबळे, जगन्नाथ काकडे, नकुल भालेकर, बन्सीधर शेळके, कल्याण सपाटे, सुनील गव्हाणे, सुरेखा लहाने, काळबांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, 1952 पासून घटना बदलण्याचे हे लोकं स्वप्न पाहतात, तिरंग्याची निर्मिती झाली तेव्हापासून तिरंगा बदलण्याचेही यांचे स्वप्न आहे. शेतमालाला भाव नाही, रासायनिक खतावर जीएसटी लावली, बेरोजगारी प्रचंड वाढली, कारण महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठमोठे प्रकल्प यांनी इतर राज्यात पळवून लावले. हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्रातील युतीचे सरकार बदलणे गरजेचे आहे.
ठाण्यातील 100 एकर वनजमीन घोटाळ्याचा पर्दाफाश करणार! राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी शिवसेनेशी गद्दारी करून पन्नास खोके एकदम ओके म्हणणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिले की महाराष्ट्र स्वाभिमानी आहे म्हणून लोकसभेत मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी खरमरीत टीका कोल्हे यांनी केली.
आमदार राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रातील सध्याचे सरकार म्हणजे लोकशाहीच्या मागे हुकूमशाही दडलेली असून, लोकांत जात, धर्म, पंथाच्या माध्यमातून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. सत्तेचा दुरुपयोग करून जे फुटत नाहीत त्यांच्यामागे ईडी लावणे, द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, कामगार व आमदर पाटील पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.