जयश्री उल्लाल बनल्या सर्वात श्रीमंत हिंदुस्थानी सीईओ; सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांना टाकले मागे

मागील अनेक वर्षांपासून जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात श्रीमंत हिंदुस्थानी सीईओ म्हणून सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांची नावे घेतली जातात. दोघेही जगातील दोन सर्वात प्रभावशाली कंपन्या चालवतात, मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025’ मध्ये दोन्ही दिग्गजांना मागे टाकत ‘अरिस्टा नेटवर्क्स’च्या सीईओ जयश्री उल्लाल यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. उल्लाल आता जगातील सर्वात श्रीमंत हिंदुस्थानी व्यावसायिक व्यवस्थापक ठरल्या आहेत.

जयश्री उल्लाल यांची एकूण संपत्ती 50,170 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या तुलनेत सत्या नडेला यांची संपत्ती 9,770 कोटी रुपये असून ते दुसऱया स्थानी आहेत, तर सुंदर पिचाई 5,810 कोटी रुपयांसह सातव्या क्रमांकावर आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील आपल्या समकालीनांना उल्लाल यांनी मोठय़ा फरकाने मागे टाकले आहे. जयश्री उल्लाल 2008 पासून ‘अरिस्टा नेटवर्क्स’ या संगणक नेटवार्ंकग कंपनीच्या अध्यक्ष आणि सीईओ पदाची धुरा सांभाळत आहेत.

n जयश्री उल्लाल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने 2024 मध्ये 7 अब्ज डॉलर्सचा महसूल नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्क्यांनी अधिक आहे. अरिस्टा नेटवर्क्समध्ये त्यांची 3 टक्के भागीदारी आहे. आज त्यांच्या मेहनतीमुळे ही कंपनी क्लाउड नेटवार्ंकग क्षेत्रात अव्वल बनली आहे. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या नेतृत्वाखाली, या सार्वजनिकरीत्या सूचिबद्ध कंपनीने 2024 मध्ये 7 अब्ज डॉलर्सचा महसूल नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 20 टक्क्यांनी वाढला आहे.