जिओची मुसंडी, जून महिन्यात 33 लाख नवे ग्राहक जोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स जिओने जून २०२६ मध्ये ३३ लाख नवीन सक्रिय वायरलेस ग्राहक जोडून दूरसंचार क्षेत्रात पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांमध्ये जिओची ही वाढ सर्वाधिक ठरली असल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

जून महिन्यात वाढलेल्या ग्राहकांमुळे जिओचा एकूण सक्रिय ग्राहकवर्ग ४९.८९ कोटींवर पोहोचला असून, कंपनीने भारती एअरटेलला मागे टाकले आहे. एअरटेलने याच कालावधीत २९.२ लाख सक्रिय ग्राहक जोडले, तर दुसरीकडे वोडाफोन-आयडिया (व्हीआय), बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये घट नोंदवली गेली आहे. सध्या देशातील एकूण सक्रिय वायरलेस कनेक्शन्सपैकी एकट्या जिओचा वाटा ४१.५ टक्के इतका आहे.