चिनी zoom अॅपला टक्कर देण्यासाठी देशी अॅप आले, एकाच वेळी 100 जण जोडले जाऊ शकणार

रिलायन्स जिओने ( Reliance Jio ) जिओ मीट (Jio Meet ) हे नवे app उपलब्ध करून दिले आहे. लॉकडाऊनमुळे कार्यालयीन बैठका घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपची निकड जाणवायला लागली होती. फक्त बैठकांसाठीच नाही तर शिक्षणासाठीही या अॅपचा वापर केला जाऊ लागला होता. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर हिंदुस्तानने 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी अनेकांनी Zoom अॅपला पर्याय शोधायला सुरुवात केली होती. या अॅपला पर्याय म्हणून जिओने देशी अॅप बाजारात आणले आहे. अँड्रॉईड आणि अॅपल अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईलवर हे  अॅप उपलब्ध करण्यात आले आहे.

jio-meet-app-2

हे अॅप मोबाईलप्रमाणे डेस्कटॉपसाठीही तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून एकाचवेळी 100 जण जोडले जाऊ शकतात. हे अॅप वापरण्यास सोपं असल्याचं सांगण्यात आलं आहे. झूमप्रमाणेच हे अॅप काम करत असल्याचंही कळतं आहे. यामध्ये एकाचवेळी 5 डिव्हाईस कनेक्ट करू शकतो. कॉल सुरू असताना तो दुसऱ्या डिव्हाईसवर हस्तांतरीत करता येऊ शकतो. यामध्ये स्क्रीन शेअरिंग आणि सेफ ड्राईव्ह मोडही असणार आहे.

सध्याच्या घडीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपमध्ये झूमशिवाय गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम ही सर्वाधिक वापरली जाणारी अॅप आहेत. जिओच्या अॅपमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, याशिवाय ऑनलाईन शिक्षणाचाही पर्याय देण्यात आलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या