भाजपच्या हिंदुत्वामुळे देशात विभागणी, जितेंद्र आव्हाड यांची टीका

देशाच्या बहुसंख्यांकांच्याच इच्छेने देश चालणार असे विधान अलाहाबाद कोर्टाचे न्यायाधीश शेखर कुमार यादव यांनी केले होते. पण यादव यांच्याविरोधात सरन्यायाधीशानी सु मोटो याचिका दाखल करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच भाजपच्या हिंदुत्वामुळे देशात विभागणी झाली आहे असेही आव्हाड म्हणाले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आव्हाड म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा म्हणाले होते की बहुसंख्यांकांच्या दादागिरीमुळे या देशाची वाट लागेल. जेव्हा एखादा न्यायाधीश संविधानाविरोधात बोलतो तेव्हा सरन्यायाधीशांनी सु मोटो याचिका दाखल करून घ्यावी असे आव्हाड म्हणाले. तसेच भाजपच्या हिंदुत्वामुळे देश विभागला गेला आहे अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे.