बदलापूरमध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि शाळेच्या व्यवस्थापना विरोधात बदलापूरकरांनी रस्त्यावरत आंदोलन केले होते. या प्रकरणी पोलिसांनी 300 आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले असून 40 जणांना अटक केली आहे. आंदोलन सुरू असताना एक महिला भाजी घेण्यासाठी आली असता तिला देखील पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक माहिची समोर येत आहे. या घटनेसंदर्भातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल फोटो हा व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉट आहे. यामध्ये आवाज बदलापूरचा या ग्रुपवर एका महिलेने पोलिसांनी तिला अटक केल्याचे सांगितले आहे. मला बदलापूर पोलिसांनी कल्याण पोलीस स्टेशनला आणले आहे. मी भाजी आणायला आले असता मला आंदोलक समजून तेथून उचलले आहे. प्लिज माझी मदत करा. माझी दोन लहान मुलं घरी आहेत. मिस्टर कामावर गेले आहेत. …हा माझ्या मिस्टरांचा नंबर आहे. प्लीज मदत करा. असे त्या मॅसेजमध्ये लिहिले आहे. या व्हायरल फोटोवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी हा कुठला मुजोरपणा आहे? असा सवाल पोलिसांनी केला आहे. हा कुठला मुजोरपणा? बाजारात भाजी आणायला गेलेल्या भगिनीला आंदोलनात असल्याचे सांगून पोलिसांनी तिला भर भाजारातून उचललं. तिच्या घरी दोन लहान मुलं आहेत…तिने ट्विट करून स्वतःच्या नवऱ्याचा नंबर देखील दिला आहे. तिची आगतिकता पाहून माझ्या लाडक्या भगिनीला वागवण्याची हीच पद्धत का? महाराष्ट्रात एवढं सगळं घडतंय. आता तरी सुधरा. आंदोलनातील सहभागी होणे म्हणजे …10 15 मुडदे पाडणे किंवा दरोडा घालणे नाही.. आंदोलन हे लोकशाहीतील सर्वात मोठे हत्यार आहे..तुम्ही कितीही प्रयत्न केला तर ते बोथट होणार नाही. काही घटनांवरून तरी शिका. लोकांना अजूनही येडं गबाळं समजू नका…वेळ आल्यावर लोकं बरोबर जागा दाखवतील.. असे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठणकावले आहे.
याआधी देखील जितेंद्र आव्हाड यांनी 300 आंदोलकांविरोधात गुन्हा नोंदवल्या प्रकरणी रोष व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कामगिरीलाचा नेत्रदीपक कामगिरी असा उपहासात्मक उल्लेख केला होता.