
गडचिरोलीतील नक्षलविरोधी कमांडो फोर्स `C-60′ आणि त्याचे संस्थापक माजी आयपीएस के.पी. रघुवंशी यांच्या कार्यकाळातील गाजलेल्या आणि वादग्रस्त घटनांना शब्दबद्ध केलेल्या पत्रकार जितेंद्र दीक्षित यांच्या ‘ट्रबलशुटर’ या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले.
गेल्या 30 वर्षांपासून पत्रकारितेत असलेल्या व क्राईम रिपार्ंटग करताना अनेक घटनांचे साक्षीदार होत असताना तसेच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयांचे कामकाज जवळून पाहिलेल्या जितेंद्र दीक्षित यांनी के.पी. रघुवंशी यांच्यावर ट्रबलशुटर हे पुस्तक लिहिले आहे. के.पी. रघुवंशी यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध महत्त्वाच्या ठिकाणी कामकाज केले. अनेक संवेदनशील प्रकरणांत महत्त्वाची भूमिका बजावली. जितेंद्र दीक्षित यांनी बऱ्याच बाबी त्यांच्या ट्रबलशुटर या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. माजी आयपीएस अधिकारी अनामी रॉय आणि बालचंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, एटीएस प्रमुख नवल बजाज, सहआयुक्त जयकुमार, हरी बालाजी यांच्यासह माजी अधिकारी के.एल. प्रसाद, सुबोध जयस्वाल आदी उपस्थित होते.
माय मराठीचा सन्मान
के.पी. रघुवंशी यांनी या वेळी मराठीतूनही आपले मनोगत व्यक्त केले. जागतिक मराठी दिन सर्वत्र जल्लोषात साजरा होत असताना रघुवंशी यांनी इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनात मराठीतूनही भाषण करत मराठी भाषेचा सन्मान केला. मनोगताची सांगतादेखील जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत केली.




























































