भाजपचे मंत्री बेताल बरळले! 15 ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य तुटकं-फुटकं

भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अपमान करणारे वक्तव्य केले आहे. ‘15 ऑगस्ट 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य हे तुटके-फुटके होते. एक दिवस असा येईल जेव्हा इस्लामाबादवर तिरंगा फडकेल आणि अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार होईल, अशी मुक्ताफळे विजयवर्गीय यांनी उधळली. त्यांचे हे भाषण सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यावरून भाजपवर टीकेची झोड उठली आहे.