जेलमध्ये असताना महापालिकेने कर्मचाऱ्याला दिला ४० हजार पगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचा अजबगजब कारभार समोर आला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या एका कर्मचाऱ्याला महापालिकेकडून ४० हजार पगार दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यात ३ मे २०२५ रोजी स्वप्नील जोशी याच्याविरोधात एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ४० दिवस तो न्यायालयीन कोठडीत होता. मात्र या काळातही त्याचा पगार सुरूच राहिला. २७ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवून जोशी हा ‘फ’ प्रभागातील कर्मचारी असल्याची माहिती दिली. नियमानुसार ४८ तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत असलेल्या कर्मचाऱ्याचे निलंबन अपेक्षित असताना त्याची हजेरी कशी लागली आणि वेतन कसे अदा झाले याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.