कल्याणमध्ये आज मिंधे गटाला खिंडार पडले. मिंधे गटाचे कल्याणचे माजी जिल्हाप्रमुख आणि विद्यमान जिल्हा सचिव साईनाथ तारे, माजी नगरसेविका मनीषा तारे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. कल्याणचे मनसे विभागप्रमुख गणेश नाईक यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मातोश्री येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून हाती भगवा देत त्यांचे स्वागत केले.
शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख साईनाथ तरे तसेच मनसेचे गणेश नाईक ह्यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेते विजय (बंड्या) साळवी… pic.twitter.com/opQp3evswX
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 3, 2024
शिवसेनेला कल्याण शहर आणि ग्रामीण परिसरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मिंधे गटाचे साईनाथ तारे तसेच त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका तसेच महिला बालकल्याण सभापती मनीषा तारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाच सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी तारे यांनी व्यक्त केला. कल्याण भवानी नगर येथील मनसेचे विभागप्रमुख गणेश नाईक यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, अरविंद सावंत, उपनेते विजय साळवी, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर उपस्थित होते.