कामिंदु मेंडिसची धमाकेदार कामगिरी, शुभमन गिलच्या विक्रमाची केली बरोबरी

श्रीलंकेच्या संघाला मागील काही महिन्यांमध्ये विशेष खेळ करता आला नव्हता. पंरतु न्युझीलंडविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेने धमाकेदार प्रदर्शन करत मालिका विजय साजरा केला. श्रीलंकेच्या सर्वच खेळाडूंचा या विजयामध्ये मोलाचा वाटा होता. ICC ने याची दखल घेतं कामिंदु मेंडिस याची Player of the Month म्हणून निवड केली आहे. या पुरस्कारासोबत त्याने टीम इंडियाच्या शुभमन गिलची बरोबरी केली आहे.

कामिंदु मेंडिस याची 2024 या वर्षामध्ये दुसऱ्यांदा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी मार्च महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. यासोबतच कामिंदु मेंडिसने शुभमन गिलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. शुभनम गिल एका वर्षात दोन वेळा ICC Player Of The Month हा किताब पटकावणारा एकमेव खेळाडू होता. शुभमन गिलने 2023 साली जानेवारी आणि सप्टेंबर महिन्यात हा किताब पटकावला होता. मात्र आता कामिंदु मेंडिसच्या नावाचा सुद्धा समावेश या यादीत झाला आहे.