दार्जिलिंगमध्ये मालगाडीची कांचनजंगा एक्प्रेसला धडक, तीन डबे रुळांवरून घसरले

देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरूच असून पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे सोमवारी भरधाव मालगाडीने कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान 15 प्रवाशी मृत्युमुखी पडले तर 60 प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान, दोन वर्षांत झालेल्या मोठय़ा रेल्वे अपघातांना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जबाबदार असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे.