पश्चिम बंगालमधील अपघातानंतर रेल्वेने 19 ट्रेन केल्या रद्द

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी एक्स्प्रेस ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या धडकेत तीन रेल्वे कर्मचाऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले आहेत. कांचनजंगा एक्स्प्रेस आसाममधील सिलचरहून कोलकातामधील सियालदहला जात होती. त्याचवेळी मागून आलेल्या मालगाडीने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर 19 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील रंगापानी रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर जवळपास 19 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहेत. डिब्रुगड -नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, हावडा-न्यू जलपायगुडी वंदे भारत एक्स्प्रेस सह अनेक मार्ग विस्कळीत झाले आहेत.

रद्द केलेल्या ट्रेनची लिस्ट

19602 न्यू जलपाईगुडी – उदयपूर सिटी साप्ताहिक एक्सप्रेस
20503 दिब्रुगड –  नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस.
12423 दिब्रुगड – नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस
01666 आगरतळा – राणी कमलापती स्पेशल ट्रेन
12377 सियालदह- नवीन अलीपुरद्वार पडटिक एक्सप्रेस
06105 नागरकोइल जंक्शन- दिब्रुगड स्पेशल.
20506 नवी दिल्ली- दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस
12424 नवी दिल्ली- दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस
22301 हावडा-  नवीन जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेस.
12346 गुवाहाटी- हावडा सराईघाट एक्सप्रेस
12505 कामाख्या- आनंद विहार ईशान्य एक्सप्रेस.
12510 गुवाहाटी-बेंगळुरू एक्सप्रेस
22302 न्यू जलपायगुडी- हावडा वंदे भारत एक्सप्रेस
15620 कामाख्या- गया एक्सप्रेस.
15962 दिब्रुगड- हावडा कामरूप एक्सप्रेस
15636 गुवाहाटी- ओखा एक्सप्रेस
15930 नवीन तिनसुकिया- तांबरम एक्सप्रेस
13148 बामनहाट- सियालदह उत्तर बंगा एक्सप्रेस
22504 दिब्रुगड- कन्याकुमारी एक्सप्रेस