
पश्चिम रेल्वे प्रशासनाने कांदिवली ते बोरिवली स्थानकांदरम्यान शनिवारी रात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. दोन्ही स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर शनिवारी रात्री 10.30 ते रविवारी सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत मोठा ब्लॉक असेल. तसेच डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री 1 ते रविवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सलग दोन दिवस घेण्यात आलेल्या मोठय़ा ब्लॉक काळात शनिवारी 45, तर रविवारी तब्बल 250 लोकल फेऱया रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना विकेण्डचा लोकल प्रवास प्रचंड डोकेदुखीचा ठरण्याची चिन्हे आहेत.


























































