
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. ती पुन्हा एकदा शेतकरी कायद्यांबाबत बरळली आहे. रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी तिने केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर विरोधक आक्रमक झाले असून निषेध करत आहेत.
कंगनाने शेतकऱ्यांशी संबंधित विषयावर भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तीन वर्षांपूर्वी तिने महिला आंदोलकांवर पैसे घेऊन आंदोलन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी शिखांबाबत वादग्रस्त वक्तव्यही केले होते.
भाजपने कंगनाच्या वक्तव्यापासून हात झटकले आहेत. यावेळीही कंगनाच्या वक्तव्याला वैयक्तिक विधान सांगितले आहे.
कंगना राणौत हिने मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा आणावेत असे विधान केले होते.