कनवाड-म्हैसाळ बंधारा पाण्याखाली

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कनवाड-म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला बंधारा पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून असलेली जलपर्णी कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रवाहित झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बंधाऱयावर पाणी अडवून ठेवल्याने मोठय़ा प्रमाणात जलपर्णी पसरली होती. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी बंधाऱयावरून वाहत असल्याने जलपर्णी प्रवाहित झाल्याने दूषित पाणी पुढे सरकत आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून, मिरज पूर्व भाग व कर्नाटककडे जाणारी वाहतूक गणेशवाडी व मिरजमार्गे वळविण्यात आलेली आहे.