
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या बैठकीला उपस्थित राहतील, असे आश्वासन सरकार देत नाही तोपर्यंत त्यांनी राजकीय पक्षांना त्यात सहभागी होऊ नये, असं आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केले आहेत.
कपिल सिब्बल म्हणाले आहेत की, “आज मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर ते सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले असते आणि विशेष अधिवेशनही बोलावले असते.” सिब्बल म्हणाले आहेत की, “आज आम्ही कोणतीही टीका करणार नाही. कारण ही टीका करण्याची वेळ नाही. आम्हाला फक्त संसदेचे विशेष अधिवेशन आणि सर्वपक्षीय बैठक बोलावायची आहे. मी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करू इच्छितो की जोपर्यंत सरकार पंतप्रधानांनाही बैठकीत उपस्थित राहण्याची हमी देत नाही, तोपर्यंत त्यांनी बैठकीला उपस्थित राहू नये.”