कराटेच्या सरावादरम्यान हाकलल्याने दगडाने मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराटेचा सराव करताना थांबलेल्या दोघांना तिथून हाकलून दिल्याच्या रागातून दोघांनी आपल्या साथीदारांना बोलावून शिवीगाळ करून गार्डन बाहेर आल्यावर कापून टाकीन,अशी धमकी दिली.तसेच एका मुलीला दगड मारून जखमी केले.ही घटना मंगळवारी (दि.2)रात्री पिंपळे सौदागर येथे लिनीयर गार्डनमध्ये घडली.

दिपाली नागेश डोणे(वय 31) यांनी सांगावी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शिवराम केशव फुलारे (वय 21,रा.रहाटणी चौक ),अभिषेक अनिल चव्हाण (वय ,20 रा.राहाटणी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.संतोष फुलारे (रा.पिंपळे सौदागर )आणि त्यांचे पाच ते सहा अनोळखी मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी दीपाली आणि त्यांच्या कराटे क्लासमधील मित्र लिनियर गार्डमनमध्ये प्रॅक्टीस करत होते.त्यावेळी तिथे थांबलेल्या आरोपी संतोष आणि शिवराम यांना फिर्यादी डोणे यांनी प्रक्टीस करत असलेल्या ठिकाणावरून हकलून दिले. त्या रागातून संतोष आणि शिवराम यांनी त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर डोणे यांचे प्रशिक्षक जहीर अन्सारी यांना शिवीगाळ करत गेटच्या बाहेर आले की, कापून टाकू अशी धमकी दिली.तसेच माधुरी स्वामी (वय 17) हिला जखमी केले. तसेच सागर जोशी याला हाताने मारहाण केली.सहायक पोलिस निरीक्षक तपास करत आहेत.