
कर्जत नगरपालिका निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीतील धुसफुस समोर आली आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासमोर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे अपशकुन ठरत आहेत. भाजपने डॉ. स्वाती लाड यांना उमेदवारी दिली असताना शिंदे गटाकडून सुवर्णा सुर्वे यांनीही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल आहे. यानिमिताने महायुतीमधील जागावाटपाची नाराजी चव्हाट्यावर आली आहे
भाजपचा अर्ज दाखल करताना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी थोरवे यांनी आपल्या गटाच्या सुवर्णा सुर्वे यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे महायुतीची अधिकृत उमेदवारी कुणाला? असा प्रश्न भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. माघारीपर्यंत यातील एक उमेदवार ‘मॅनेज’ होईल अशीही रंगतदार चर्चा दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.



























































