कठुआ बलात्कार प्रकरण,प्रमुख साक्षीदारांच्या कोठडीतील अमानुष छळाची गंभीर दखल

21
supreme_court_295

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कठुआ सामुदायिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील प्रमुख आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तालीब हुसेन याचा पोलीस कोठडीत अमानुष छळ करण्यात आल्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेत याप्रकरणी आता जम्मू आणि कश्मीर सरकारकडून खुलासा मागवला आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या छळवणूकसंदर्भात जम्मू आणि कश्मीर सरकारकडून लेखी उत्तर मागवले आहे. याप्रकरणी सरकारने येत्या 29 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करावे, असे आदेश देत खंडपीठाने पुढील सुनावणी त्याच दिवशी ठेवली आहे.

मेहुणीने दाखल केलेल्या बलात्काराच्या गुह्याप्रकरणी जम्मू-कश्मीर पोलिसांनी आपल्याला अटक केली होती. अटकेत असताना पोलीस कोठडीत आपला अमानुष छळ करण्यात आला, असा आरोप करीत तालिब हुसेन याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेची सुनावणी वरील खंडपीठासमोर झाली. त्यावेळी सदर आदेश देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या