केदारनाथची हेलिकॉप्टर सेवा 21 एप्रिलपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार धाम यात्रा 2026 साठी केदारनाथ धामची कपाटे 22 एप्रिलपासून खुली होतील. तर 21 एप्रिलपासून हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. यासाठी उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाने भाडे दर निश्चित केले आहेत. हेलिकॉप्टर सेवा गुप्तकाशी ते केदारनाथ, फाटा ते केदारनाथ आणि सिरसी ते केदारनाथ अशी असेल.

चारधाम यात्रेला 19 एप्रिल रोजी यमुनोत्री आणि गंगोत्रीची कपाटे खुली होऊन प्रारंभ होईल. केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर सेवेचा वापर जास्त प्रमाणात होतो. गुप्तकाशी, फाटा आणि सिरसी येथून हेलिकॉप्टर सर्विस चालवली जाते. त्यासाठी यंदा नवीन टेंडर काढण्यात आले आहे. टेंडर प्रक्रियेत अनेक ऑपरेटर्सनी सहभाग घेतला. त्यातील आठ जणांची निवड झाली आहे.

किती आहे भाडे?

  • गुप्तकाशी ते केदारनाथ-प्रती व्यक्ती 6077 रुपये
  • फाटा ते केदारनाथ-प्रती व्यक्ती 4840 रुपये
  • सिरसी ते केदारनाथ-प्रती व्यक्ती 3043 रुपये. यामध्ये जीएसटी आणि सुविधा शुल्क जोडले जाते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सिरसी आणि गुप्तकाशी येथून प्रवासाचे हेलिकॉप्टरचे भाडे कमी करण्यात आले आहे. तर फाटा येथील भाडे वाढवण्यात आले आहे. गेल्या वर्षी फाटा येथून केदारनाथला येण्या-जाण्याचे भाडे 8842 रुपये होते, ते 838 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. भाविकांनी IRCTC Heli Yatra या अधिकृत पोर्टलवरून बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.