केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांना हायकोर्टाचा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळ हायकोर्टाने बुधवारी केंद्रीय पेट्रोलियम राज्य मंत्री सुरेश गोपी यांना जोरदार झटका दिला आहे. कोर्टाने त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेविरोधात करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. न्यायाधीश कौसर एडप्पागथ यांनी हा निकाल दिला. त्रिशूरमधील एआयवायएफ नेते बिनॉय एएस यांनी सुरेश गोपी विरोधात याचिका दाखल केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारावेळी गोपी यांनी चुकीची पद्धत अवलंबिली होती. त्यांनी निवडणुकीत धार्मिक प्रतीकांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला होता, असे याचिकेत म्हटले होते.