
मनी लॉण्डरिंग प्रकरणात व्यावसायिकाकडे 2 कोटींची लाच मागणाऱया ईडीच्या लाचखोर अधिकाऱयाला सोमवारी केरळ उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. ईडीचा सहाय्यक संचालक शेखर कुमारला 11 जूनपर्यंत अटक करू नका, असे निर्देश न्यायालयाने पोलिसांना देले. अटकेच्या भीतीने कुमारने अर्ज केला आहे. त्याने मॅटर सेटल करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. दोन दिवसांपूर्वीच ओडिशामध्ये ईडीच्या आणखी एका लाचखोर वरिष्ठ अधिकाऱयाला 20 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.