खाप पंचायतीची मुलांच्या हाफ पँट घालण्यावर बंदी

उत्तर प्रदेशातील बागपत येथे खाप चौधरींच्या पंचायतीत अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यात आले. केवळ मुलींच्या पेहरावाबाबतच नव्हे, तर मुलांच्या पोशाखासह त्यांच्या मोबाइल फोन वापरण्यासंदर्भात निर्णय पंयाचतीच्या बैठकीत घेण्यात आले. देशखाप चौधरी ब्रजपाल सिंह धामा यांनी स्पष्ट केले की, ‘समाजात सभ्यता राखणे महत्त्वाचे आहे. मुले हाफ पँट घालून घराच्या आत आणि बाहेर फिरतात, जे योग्य नाही. यामुळे समाजातील सुना आणि मुलींवर नकारात्मक प्रभाव पडतोय. मुलांना आता पूर्ण पँट किंवा पारंपरिक कुर्ता-पायजमा घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.